शिखर धवनचा घटस्फोट मंजूर

पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं न्यायालयानं केलं मान्य
Edited by:
Published on: October 05, 2023 13:08 PM
views 1051  views

भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. शिखर धवन जवळपास १० महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोर्टात प्रलंबित असणारं त्याचं घटस्फोटाचं प्रकरण याचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे. शिखर धवनला आता दिल्ली कोर्टानं मोठा दिलासा दिला असून, त्याला पत्नी आएशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. शिखर धवनला पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात होता, हा धवनचा दावा न्यायालयानं मान्य केला आहे.

बऱ्याच काळापासून शिखर धवनच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयाकडे प्रलंबित होतं. दिल्लीच्या पतियाला कुटुंब न्यायालयात शिखर धवननं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार शिखर धवननं आपल्या याचिकेत केली होती. पत्नी आएशा मुखर्जी आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचंही शिखर धवननं याचिकेक नमूद केलं होतं. या सर्व प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं शिखर धवनला घटस्फोट मंजूर केला आहे.