देवगड : देवगड येथीलशेठ म.ग.हायस्कुल येथील पटांगणावर झालेल्या तालुकास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धेत शेठ म.ग.हायस्कूलच्या दोन्ही संघ संघानी विजेतेपद मिळवले आहे.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी देवगड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा स्थानीय समिती सदस्य चंद्रकांत शिंगाडे सर,हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे ,पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, उत्तरेश्वर लाड, हायस्कूल क्रीडाशिक्षक सुरेश पवार, ज्ञानेश्वर कुंभरे, अरविंद धुर्वे आदिनाथ गरजे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण दहा शाळांचे संघ सहभागी झालेले होते. यामध्ये १४वर्षाखालील गटात आणि १७ वर्षाखालील गटामध्ये शे म.ग .हायस्कूलच्या संघानी इतर संघांवर मात करून विजेतेपद पटकाविले. या दोन्ही संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे.देवगड हायस्कूल येथे पार पडलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंसाठी आणि मार्गदर्शक शिक्षकांसाठी हायस्कूलतर्फे भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती.
या दोन्ही विजेत्या संघाचे अभिनंदन शाळेच्या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि पालक वर्गाने देखील केलेले आहे.या सर्व खेळाडूंना शाळेतील क्रीडाशिक्षक सुरेश पवार, ज्ञानेश्वर कुंभरे आणि अरविंद धुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले,या स्पर्धेसाठी पंच म्हणून आकाश पारकर, दुर्गेश कुबल, उत्तरेश्वर लाड,आदिनाथ गरजे ,शहाजी गोफणे आणि युनिती यांनी काम पाहिले