
सावंतवाडी : पुणे, बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हातून शैलेश विष्णू सावंत याने 25 मिटर 0.22 पिस्तूल प्रकारात (खुला गट )सहभाग घेतला होता. यात त्याने 300 पैकी 245 गुणांची नोंद करत 34 वी ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
ही स्पर्धा 31ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद, गुजरात येथे होणार आहे. यापूर्वी शैलेशने 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारात केरळ व भोपाळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड झाली होती. तो उपरकर शूटिंग अकॅडमी, सावंतवाडी येथे नेमबाजीचा सराव करत असून त्याला प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तर विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.














