सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित वेंगुर्ले तालुका कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने वरिष्ठ (पुरूष व महिला) जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा नुकत्याच वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडल्या.
अतिशय उत्साहत संपन्न झालेल्या ह्या स्पर्धेत बांद्यापासून देवगडपर्यंत च्या ११२ स्पर्धकानी सहभाग घेतला. स्पर्धेचा उदघाटन समारंभ सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन वालावलकर, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अवधूत भणगे, सदस्य श्री अनिल कम्मार,वेंगुर्ला तालुका असोसिएशनचे अब्दुल शेख,शुभभाई मुंडले व ज्येष्ठ पत्रकार श्री. सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. ही स्पर्धा वरिष्ठ खुला ( पुरुष/ महिला) गट, महिला गट व खुला दुहेरी गटात खेळविण्यात आली. ही स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, सिद्धीविनायक इन्फ्रा प्रोजेक्ट्स सावंतवाडी यांनी पुरस्कृत केली होती.
प्रथम पार पडलेल्या खुल्या दुहेरी गटातील अंतिम सामन्यात कणकवलीच्या अनिल कम्मार व गौतम यादव या जोडीने सावंतवाडीच्या अर्पित बांदेकर व मयुरेश नाईक या जोडीला 23-10, 17-9अशा सेटमध्ये पराभूत करून दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
महिला गटाचा अंतिम सामना सावंतवाडीची केशर निर्गुण व कणकवलीची दीक्षा चव्हाण यांच्या मध्ये झाला. यामध्ये दीक्षा चव्हाणने केशर निर्गुणवर तीन सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात 20-23,16-6,,19-15 अशी मात करून महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.
पुरुष गटात कणकवलीच्या डॉ. अनिल तायशेटे यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम सामन्यात सावंतवाडीच्या अर्पित बांदेकर वर पहिला सेट 3-24 असा गमावल्यावर 19-17,24-14 अशा तीन सेटमध्ये मात करून प्रथमच पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे.
*पुरुष (खुला) दुहेरी गट**
1) अनिल कम्मार /गौतम यादव, कणकवली
2) अर्पित बांदेकर /मयुरेश नाईक, सावंतवाडी
3)रोहन राजाध्यक्ष /प्रतीक बांदेकर, सावंतवाडी
*महिला एकेरी गट*
1)दीक्षा चव्हाण, कणकवली
2)केशर निर्गुण, सावंतवाडी
3)मयुरी गावडे, सावंतवाडी
*पुरूष एकेरी गट*
1) डॉ.अनिल तायशेटे, कणकवली
2)अर्पित बांदेकर, सावंतवाडी
3)रामा गावडे, सावंतवाडी
4)ओंकार कुबल, वेंगुर्ला
5)सागर ढवळ, कुडाळ
6)अवधूत लाड, कणकवली
7)गौतम यादव, कणकवली
8)प्रशांत म्हात्रे, कुडाळ
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अवधूत भणगे, सदस्य श्री.अमोल खानोलकर,श्री.पाताडे,श्री. अनिल कम्मार, स्पर्धेचे प्रमुख पंच अमेय पेडणेकर,शुभभाई मुंडले यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमेय पेडणेकर, सहायक पंच राजेश निर्गुण यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे शुक्राचार्य म्हाडेश्वर, वेंगुर्ला कॅरम असोसिएशनचे अब्दुल शेख, शुभभाई मुंडले, ओंकार कुबल , चेतन नार्वेकर, आशिष बागकर यांनी विशेष परिश्रम घेतले.