कुडाळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सांगलीच्या वतीने विभागीय स्तरावर जिल्हा क्रीडा संकुलन येथे 19 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा विद्यार्थी यश बळीराम कदम या विद्यार्थ्यांना 17 वर्ष वयोगटात लांब उडी या प्रकारात 6.29 मीटर उडी मारून विभागात पहिला आला असून त्याची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उत्तुंग यशाबद्दल संस्था अध्यक्ष आपासाहेब गावडे व सचिव नागेंद्रजी परब, प्रशालेचे मुख्याध्यापक मालवणकर , पर्यवेक्षक एम. जी. कर्पे, संस्था संचालक पाटील सर व सर्व संचालक तसेच क्रीडा शिक्षक भाटकर सर, जाधव सर व चोरगे सर या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.