सावंतवाडी : नुकतीच ३१ वी ऑल इंडिया जी व्ही मावळंकर शूटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धा ( रायफल ) १० ते १४ ऑक्टो. या कालावधीत आसनसोल, पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आली. हि स्पर्धा १० मीटर पीप साईट प्रकारात घेण्यात आली. यात १२ राज्यांमधून १२४० स्पर्धक सहभागी झाले होते. यात कुमारी सानिया सुदेश आंगचेकर, वेंगुर्ले ( एस. पी. के कॉलेज सावंतवाडी ) हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत युथ व जुनियर या वयोगटात सहभाग घेऊन ४०० पैकी ३८१ गुणांची नोंद करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत सौ शुभदा देवी खेमसावंत भोसले राणीसाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक सी. ए. नाईक, कनिष्ठ महाविद्यालय समन्वय विजय राठोड व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.