सिंधुदुर्ग : शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय सिलंबम पंच परीक्षेमध्ये प्राध्यापक विवेक राणे यांची सिलंबम राज्यस्तरीय पंचपदी निवड झाली. प्रा. विवेक राणे हे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘सिलंबम’ हा एक मार्शल आर्ट प्रकार असून शालेय खेळ सुद्धा आहे. या खेळ प्रकारामध्ये लाठी-काठी फिरवणे व फाईट, भाला, तलवार फिरवणे इत्यादी १७ प्रकारच्या शस्त्रांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन, सिंधुदुर्ग या संस्थेचा मानस आहे. येणाऱ्या शालेय सिलंबम स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला योग्य ते सहकार्य केले जाईल, असे प्रा. विवेक राणे म्हणाले. तसेच येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये प्रत्येक शाळेने सहभागी व्हावे, असे आवाहन ही प्रा. विवेक राणे यांनी केले.