देवगड : जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी.कींजल संतोष अदम हिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रघुनाथ काळे प्र.मुख्याध्यापक संजय गोगटे, क्रीडा शिक्षक सुनील जाधव, मंगेश गिरकर उपस्थित होते.