सावंतवाडी : क्रीडा संकुलन ओरोस येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव ची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा न्हानू जोशी हिने 17 वर्षे वयोगटात भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे
या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. फाले, पर्यवेक्षक कदम मळगाव, एके वर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, अध्यक्ष शिवराम मळगावकर, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. पुढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यात तिला संदीप कारीवडेकर व आनंदी मोर्ये यांचे मार्गदर्शन लाभले.