सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कुराश महासंघाच्या माध्यमातून झालेल्या निवड चाचणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे असोसिएशन सावंतवाडीच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
कुमारी दुर्गा दिनेश जाधव, निधी राऊळ, काव्या तळवणेकर, आदिती सावंत, कोमल बिस्वा तसेच मुलांमधून यश कडव, श्लोक चांदेकर, आबान बेग, ओम परब यांनी हे यश मिळवल. प्रशिक्षक म्हणून मुख्य प्रशिक्षक दिनेश जाधव (जुडो आणि कुराश) तसेच फोंडाघाट मुख्य प्रशिक्षक अजिंक्य पोपळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक वसंत जाधव सेन्सॉय आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.