
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
या स्पर्धेत शाळेच्या एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी चार संघांनी प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी आपली जागा निश्चित केली आहे. तर, दोन संघ जिल्हास्तरावर उपविजेते ठरले आहेत. रोल बॉल स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळाले आहे.
शालेय रोल बॉल स्पर्धेत आर.पी.डी. हायस्कूलने विशेष यश मिळवले आहे. खालीलप्रमाणे चार संघ विजयी होऊन विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत १४ वर्षांखालील मुले,१७ वर्षांखालील मुले
१७ वर्षांखालील मुली,१९ वर्षांखालील मुली या व्यतिरिक्त, १९ वर्षांखालील मुलांचा संघ आणि १४ वर्षांखालील मुलींचा संघ जिल्हास्तरावर उपविजेता ठरला आहे. या यशाबद्दल शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत आणि सर्व संस्था सदस्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीम. संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक श्री. एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, तसेच पालक-शिक्षक संघ आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या यशाबद्दल खेळाडूंचे कौतुक केले आहे.