इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचे शालेय कॅरम स्पर्धेत यश

आर्यन दळवी द्वितीय तर पियूष परब तृतीय
Edited by: विनायक गांवस
Published on: August 17, 2025 21:05 PM
views 232  views

सावंतवाडी : गुरुवर्य बी एस नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी येथे आयोजित शालेय कॅरम स्पर्धा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहयोगाने भरत अकॅडमी सावंतवाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. 

ही स्पर्धा आमदार दिपक केसरकर यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या कु. आर्यन निलेश दळवी याने द्वितीय तर पियूष संजय परब याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना  कॅरम प्रशिक्षक म्हणून अश्फाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली मनोज नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले