
सावंतवाडी : गुरुवर्य बी एस नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे च्या विद्यार्थीनींनी सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो असोसिएशन तर्फे कासार्डे येथे आयोजित जिल्हास्तरीय ज्यूडो स्पर्धेत घवघवीशीय संपादन केले. यशस्वी विद्यार्थीनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यामध्ये इयत्ता नववी कु. स्वरा निलेश दळवी तर इयत्ता आठवी मधील कु. मानवी संतोष म्हारव या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांना ज्यूडो प्रशिक्षक म्हणून मंगेश घोगळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली मनोज नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.