सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील ओटवणे येथील मोरया इलेव्हन आयोजित खुल्या अंडर नाइंटीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धेत सावंतवाडी हा संघ विजेता झाला आणि वेतोरे हा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघास अर्चना घारे-परब यांनी शुभेच्छा दिल्या तसेच मोरया इलेव्हन या आयोजक संघाचे कौतुक केले. तसेच भविष्यात अश्या स्पर्धेतून मोठे क्रिकेटियर तयार होतील असा विश्वास मनोगतात व्यक्त केला. यावेळी तालुका अध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, उपसरपंच कासकर, लुमा जाधव उपस्थित होते