सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित, तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा नुकत्याच येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथील कॅरम हॉलमध्ये पार पडल्या.
सदर स्पर्धा १४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली अशा एकूण सहा गटात खेळविण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा समन्वयक श्री. नंदकुमार नाईक, श्रीम. शेरॉन आल्फान्सो व तालुक्यातील क्रीडा शिक्षक, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र कॅम्म असोसिएशनच सहसचिव श्री. योगेश फणसळकर, राजेश निर्गुण यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून योगेश फणसळकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम सहा खेळाडूंची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.१४ वर्षाखालील मुलगे प्रथम कुमाल खोरागडे, वि. स. खांडेकर विद्यालय,.द्धितीय मोहम्मद फैझ झहीर शेख, सेंट्रल इंग्लिश स्कूल,.तृतीय निश्चय रवींद्र कुंभार, मिलाग्रीस हाय..चौथा लिखित सचिन भानुशाली, यशवंतराव भोसले इंटर. स्कूल, , पाचवा फुदेल हसन आगा- सेंट्रल इंग्लिश स्कूल,.सहावा मोहम्मद झईद मेमन, सेंट्रल इंग्लिश स्कूल, यांनी यश संपादन केले आहे.
१४ वर्षाखालील मुली मध्ये प्रथम आस्था अभिमन्यू लोंढे - मिलाग्रीस हाय, द्वितीय साक्षी रमेश रामदूरकर - कळसुलकर हाय, तृतीय सौम्या सागर हरमलकर मदरक्वीन्स इं. स्कूल, चौथी अनम शाबिर खान, सेंट्रल इंग्लिश स्कूल, पाचवी वैष्णवी भरत गवस -मदरक्वीन्स इंग्लिश स्कूल, सहावी हुमेरा मुझफ्फर मिर्झा, सेंट्रल इंग्लिश स्कूल यांनी यश संपादन केले आहे.
१७ वर्षाखालील मुलगे-प्रथम अमुल्य अरुण घाडी, मिलाग्रीस हायस्कूल, द्वितीय देवांग रमाकांत मल्हार, आर.पी. डी. हायस्कूल, तृतीय भूषण प्रमोद मडगावकर,मदरक्वीन्स इंग्लिश स्कूल,चौथा भावेश विजय कुडतरकर, मिलाग्रीस हाय. स्कूल, पाचवा स्वप्नील मंगेश लाखे -कळसुलकर हायस्कूल,सहावा शार्दुल देव - सैनिक स्कूल आंबोली यांनी यश संपादन केले आहे.
१७ वर्षाखालील मुली- प्रथम प्रणिता नथुराम आयरे कळसुलकर हाय, द्वितीय स्वरा प्रसाद डेगवेकर - कळसुलकर , तृतीय भावना संतोष लाखे , आरपीडी हायस्कूल, चौथी मानसी नरपतराज रावल,आरपीडी, पाचवी सानिया मांजरेकर, महात्मा गांधी विद्यामंदिर, सातार्डा, सहावी वैभवी प्रभू - महात्मा गांधी विद्यामंदिर, सातार्डा यांनी यश संपादन केले आहे.
१९ वर्षाखालील मुलगे : प्रथम राम प्रकाश फाले - मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेज, द्वितीय स्वरूप नारायण नाईक - यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, तृतीय विराज संजय निवेलकर, आर.पी. डी. ज्युनिअर कॉलेज, चौथा प्रणित प्रविण गोसावी, आर.पी.डी. ज्युनि. कॉलेज, पाचवा सोहम सुधीर पाटील. आर.पी.डी. हाय. व ज्युनि. कॉलेज,सहावा नाथन विल्सन अल्मेडा, यशवंतराव भोसले. इंटरनॅशनल स्कूल, चराठे यांनी यश संपादन केले आहे.
१९ वर्षाखालील मुली : प्रथम क्षितिजा विजय मुंबरकर, राणी पार्वतीदेवी हाय. व ज्युनि. कॉलेज, हीने पटकाविला आहे.