
सावंतवाडी : नुकतीच पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र एअर अँड फायरआर्म शूटिंग कॉम्पिटिशन 2025 संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गचे नेमबाज सहभागी झाले होते. सावंतवाडी येथील खेळाडू कु. प्रतीक्षा प्रशांत सावंत हिने 25 मिटर स्पोर्ट पिस्तूल मध्ये सहभागी होऊन 300 पैकी 248 गुणांची कमाई करत पाचवा क्रमांक पटकावीला. या क्रीडा प्रकारात दुसऱ्यांदाच सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तिची गोवा येथे होणाऱ्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशीप तसेच अहमदाबाद येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.व्ही मावळणकर शूटिंग चॅम्पियनशीप साठी निवड झाली आहे. यापूर्वी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिची भारतीय निवड चाचणी संघात निवड झाली होती तसेच तिने देशात 63 वे रँकिंग मिळविले होते.
ती उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे तसेच कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे नेमबाजीचा सराव करत आहे.तिच्या या यशामध्ये तिचे वडील श्री प्रशांत सावंत (मुख्याध्यापक,सातार्डा हायस्कूल.) यांचा मोलाचा वाटा आहे.