सावर्डे विद्यालयाची तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच

Edited by: मनोज पवार
Published on: September 20, 2025 11:22 AM
views 81  views

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने सह्याद्री क्रीडा संकुलात तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने नऊ गडी राखून शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात सावर्डे विद्यालयाने मिरजोळी संघावर एकही गडी न गमावता विजय मिळवला. या संघात ओंकार कदम, यश डिके, आयुष भंडारी, वेदांत भंडारी, अथर्व बेंद्रे, श्रवण मेस्त्री, करण मेस्त्री, विघ्नेश बने, आर्यन भुवड, शार्दुल लकेश्री, साईराज निर्मळ, सागर सुर्वे आदी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

याच स्पर्धेत सावर्डेच्या 14 वर्षे वयोगटातील संघाने द्वितीय क्रमांक मिळवत दमदार छाप पाडली. प्रशिक्षक शिरीष जाधव यांच्यासह मार्गदर्शक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन संघाला लाभले.

स्पर्धेचे उद्घाटन सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम आणि विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे यांच्या हस्ते करण्यात आले.

 क्रिकेटपटूंनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम सचिव महेश महाडिक ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर संस्थेचे सर्व पदाधिकारी शालेय समितीचे सदस्य विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व क्रिकेट प्रेमींनी विजयी संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी क्रिकेटपटूंचे अभिनंदन करताना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व मार्गदर्शक शिक्षक