कोळथरेच्या दुर्गामाता क्रीडा मंडळाची सानिका भाटकर खेळणार महाराष्ट्राच्या कबड्डी संघात..!

क्रीडा मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक सचिन चव्हाण यांच्या मेहनतीला यश
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 23, 2022 17:05 PM
views 250  views

देवगड : कोळथरे येथील दुर्गामाता क्रीडा मंडळाचा मुलींचा कबड्डी संघ आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला आहे. आजपर्यंत अनेकदा विविध वयोगटातून, कोळथरेच्या अनेक कबड्डी खेळाडू जिल्ह्याला, राज्याला स्पर्धेत खेळल्या आहेत व त्यांनी स्वतःची छाप उमटवलेली आहे.

 क्रीडा मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक सचिन चव्हाण यांची प्रचंड मेहनत या सर्व मुलींना तयार करण्यासाठी अखंड सुरू असते. रोजचा व्यायाम, रोजचा मैदानी सराव,  कौशल्य विकास ई. च्या माध्यमातुन चव्हाण आपल्या संघाला अधिकाधिक तरबेज बनवत आहेत. आपल्या दापोली तालुक्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणी मध्ये दुर्गामाता क्रीडा मंडळाची खेळाडू - कु.सानिका संजय भाटकर हिची महाराष्ट्राच्या संघातून खेळण्यासाठी निवड झालेली आहे. वर नमूद केलेली, 6 वी कुमार गट मुले मुली फेडरेशन ची स्पर्धा मदुराई, तामिळनाडू येथे जानेवारी महिन्यात होत आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात आमच्या शाळेत शिकणारी, आमच्या क्रीडा मंडळाची खेळाडू चमकणार आहे ही आमच्या साठी विशेष आनंदाची बाब असल्याचे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी नमूद केले