सिंधुदुर्गनगरी : विभागस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धा (१४,१७,१९ वर्षाखालील मुलगे व मुली) दिनांक १५ व १६ डिसेंबरला कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील मामाचो गाव रिसॉर्ट येथे पार पडल्या. या विभागस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात सांगलीची जिया महात प्रथम तर कोल्हापूरची दिशा पाटील हिने व्दितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयातून तब्बल २१२ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा पार पडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी दीपक वायचळ, शार्दुल तपासे, चिंतामणी लिमये, स्वानंद चोथे, श्रीकृष्ण आडेलकर या पंचांच्या सहकार्याने विभागस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या.
बुद्धीबळ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
१४ वर्षाखालील मुली -
प्रथम - जिया महात (सांगली), व्दितीय - दिशा पाटील (कोल्हापूर), तृतीय - महिमा शिर्के (कोल्हापूर), चतुर्थ - अरिना मोदी (कोल्हापूर), पाचवा - सई प्रभुदेसाई (रत्नागिरी).
१४ वर्षाखालील मुलगे -
प्रथम - विक्रमादित्य चव्हाण (सांगली), व्दितीय- ईशान कुलकर्णी (सांगली), तृतीय- मानस महाडेश्वर (कोल्हापूर), चतुर्थ- व्यकटेश खांडेपाटील (कोल्हापूर), पाचवा- अथर्व तावरे (कोल्हापूर).
१७ वर्षाखालील मुली -
प्रथम - हर्षिता काटे (कोल्हापूर), व्दितीय- मुग्धाली निकम (कोल्हापूर), तृतीय- सृष्टी हिप्परगी (सांगली), चतुर्थ - गायत्री राठोड (सिंधुदुर्ग), पाचवा - अदिती पाटील (रत्नागिरी).
१७ वर्षाखालील मुलगे -
प्रथम - सौरीश कशेळकर (रत्नागिरी), व्दितीय- अपूर्व देशमुख (कोल्हापूर), तृतीय - ओंकार सावर्डेकर (रत्नागिरी), चतुर्थ - सन्मित शहा (सातारा), पाचवा - अभिषेक पानसे (सांगली).
१९ वर्षाखालील मुली -
प्रथम - शर्वरी कबनुरकर (कोल्हापूर), व्दितीय- ईशिता लाहोटी (सातारा), तृतीय - राजप्रिया जंगम (सांगली), चतुर्थ- वैष्णवी वाळवेकर (कोल्हापूर), पावचा- मृणाल यादव (सातारा).
१९ वर्षाखालील मुलगे -
प्रथम - आदित्य सावळकर (कोल्हापूर), व्दितीय - असिम सय्यद (सातारा), तृतीय - सारंग पाटील (कोल्हापूर), चतुर्थ - अथर्व पंढरपुरे (सातारा), पाचवा- यश गोगटे (रत्नागिरी).