
सावंतवाडी : सावंतवाडीतील एस. के. क्रिकेट अकॅडमी यांच्यावतीने जिमखाना मैदान येथे "गेट सेट गोवा" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. RUCA सांगली आणि VLCA गोवा या संघांमध्ये अंतिम सामना रंगला.
RUCA सांगली या संघाने अप्रतिम खेळ करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान सोहळ्यात विजेत्या संघाचे अभिनंदन करत स्पर्धेत सहभागी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे काशिनाथ दुभाषी, एस. के. क्रिकेट अकॅडमीचे मंदार कदम, नंदकुमार कदम, दिनेश सावंत उपस्थित होते.