
सावंतवाडी: नुकतीच मुंबई वरळी येथे महाराष्ट्र राज्य एअर वेपन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ऋतुराज लाखे व शंतनू लाखे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभाग घेतला.
ही स्पर्धा 10 मी. पीपसाईट व 10 मी. एअरपिस्तूल प्रकारात घेण्यात आली.यात मुंबई, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, नाशिक, धुळे, अमरावती अश्या विविध जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. ऋतुराज सागर लाखे (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) व शंतनू श्याम लाखे (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) हे 10मी. एअर पिस्तूल प्रकारात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली व पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरले.त्यांची निवड वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप व ऑल इंडिया जी व्ही मावळणकर स्पर्धेसाठी झाली आहे.
दोन्ही खेळाडू हे उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.