कुडाळचा प्रिन्स चषक वेंगुर्ल्याच्या रोहित स्पोर्टसकडं !

प्रिन्स स्पोर्टस क्लब, समादेवी मित्रमंडळ, कुडाळ व श्री कलेश्वर मित्रमंडळ, नेरूर यांचे उत्तम नियोजन
Edited by: भरत केसरकर
Published on: January 16, 2023 16:55 PM
views 588  views

कुडाळ : प्रिन्स स्पोर्टस  क्लब, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आयोजित कुडाळ येथील प्रिन्स चषक आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघ विजेता तर उमेश इलेव्हन हुंबरट संघ उपविजेता ठरला आहे. कुडाळ -  मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तब्बल  ३३ वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यातच सर्व आयोजकांचे  यश आहे. प्रेक्षकांचा देखील या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभतो. महाराष्ट्रसह गोवा राज्यातील खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झाले. स्पर्धेतून चांगले खेळाडू घडावेत, हा स्पर्धेमागील उद्धेश आहे. स्पर्धेचे उत्तम नियोजन करण्यात आले.ही स्पर्धा अखंडित सुरु ठेवण्यात यावी. त्यासाठी जे जे सहकार्य लाभेल ते करण्यात येईल, असे आश्वासन आ. वैभव नाईक यांनी यावेळी केले.

कुडाळ येथील तहसीलदार कार्यालय नजीकच्या मैदानावर गेले पाच दिवस सदर क्रिकेट स्पर्धा चालू होती. या स्पर्धेत सिंधुदुर्गसह महाराष्ट्र व गोव्यातील नामवंत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले विरुद्ध उमेश इलेव्हन, हुंबरट यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना अडचणीत सापडलेल्या वेंगुर्ले संघाच्या बबलू पाटील याने तडाखेबंद ४८ धावांची नाबाद खेळी आणि विजय पावले याच्या २५ धावांमुळे ८ षटकात ९३ धावांपर्यंत मजल मारली. बरकत शेख, विजय पावले, अंकीत यांच्या भेदक गोलंदाजीमुळे हुंबरट हा संघ ५४ धावा करू शकला. त्यामुळे रोहित स्पोर्टस संघाने विजय मिळवत अजिंक्यपदाला गवसणी घातली. या सामन्यात सामनावीर विजय पावले याला गौरविण्यात आले. उपांत्य फेरीतील व अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी झाली होती. 

बक्षीस वितरण प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष डाॅ. संजय निगुडकर, डाॅ. संजीव आकेरकर, डाॅ. अमोघ चुबे, डाॅ.जी. टी. राणे, दिलीप परब, शेळके पोलीस, नदीम खान, अतुल सामंत, डॉ. संदीप पाटील, बबन परब, सुनील धुरी, कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, काका कुडाळकर, अनिल हळदीवे, अभय शिरसाट, विशाल परब, प्रवीण मांजरेकर, संजय भोगटे, सुहास बाणावलीकर, सचिन कांबळी, सद्गुरू डिचोलकर, दीपक कुडाळकर, प्रदीप माने, अतुल सामंत, संजय बांदेकर, अनिल कुलकर्णी, चंद्रशेखर आमिष, मकरंद नाईक, सिद्धेश सावंत, श्याम कोळंबकर, किरण वारंग, महेश कुडाळकर, रुपेश कुडाळकर,  बंड्या सावंत, राजा परब, धैर्यशील परभणीकर, मंगेश तेंडोलकर, निळकंठ वंजारे, सहदेव घाडी, अॅड. सुधीर भणगे, शेखर गावडे, अशोक साळवी, दीपक धुरी, नागेश सावंत, संजय पाटकर, रवी कविटकर, धनंजय परब, गोपाळ वेंगुर्लेकर आदींसह मंडळाचे सदस्य तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. समालोचन शेखर दळवी, बादल चौधरी, जय भोसले व राकेश शिंदे यांनी केले तर सिद्धेश सावंत, निळकंठ वंजारे, सचिन कांबळी व रूपेश कुडाळकर यांनी गुणलेखन केले. पंच म्हणून किशोर भगत, उत्तम मोटे व मंगेश धुरी यांनी काम पाहिले.