
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे झालेल्या विभागीय शालेय वेटलिप्टींग स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी रोहन रामचंद्र गावडे यांने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात 60 किलो वजन गटांत 112 किलो वजन उचलून विभागस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्य पदक संपादन केले.
17 वर्षाखालील 88 किलो वजन गटांत आदित्य आनंद राऊळ यांने 100 किलो वजन उचलून विभागस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्य पदक संपादन केले. या दोन्ही खेळाडूंनी ग्रामीण भागातील नेमळे शाळेचे नाव विभागस्तरावर नेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ, उपाध्यक्ष हेमंत भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, सचिव स.पा. आळवे, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी, श्रीकृष्ण म्हाडेश्वर, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले. यश प्राप्त खेळाडूना क्रीडाशिक्षक आर. के. राठोड यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांचे ही अभिनंदन केले.