सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभागाची हर्षदा पवार हिची महाराष्ट्रातर्फे 3 नोव्हेंबर ते 09 नोव्हेंबर 2024 या कालावधीत केरळ तिरुवंतपुरम या ठिकाणी होणाऱ्या XXXIII G.V.ऑल इंडिया रायफल शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये निवड झाल्याबद्दल 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांनी हर्षदाचा मेडल आणि सर्टिफिकेट देउन सत्कार केला सोबत मार्गदर्शक लेफ्टनंट प्रा. डॉ एम आर खोत. Skp सिंधुदुर्ग कॉलेज मालवण, हर्षदा चे वडील दादासाहेब पवार आणि आई ज्योती पवारगेली 08 महिने हर्षदा 58 महाराष्ट्र बटालियन आर्मी सिंधुदुर्ग कडून कोल्हापूर ग्रुप पुणे डायरेक्टडेड आणि महाराष्ट्र पातळीवर खेळत आहे आतापर्यंत तिने दहा दहा दिवसाचे नऊ कॅम्प केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तिने यश घेतलेल आहे आणि आता तिची राष्ट्रीय पातळीवरील केरळमध्ये तिरवंपुरम या ठिकाणी 3 नोव्हेंबर पासून 09 नोव्हेंबर पर्यंत होत असलेल्या XXXIII GV ऑल इंडिया रायफल् शूटिंग कॉम्पिटिशन साठी निवड झालेली आहे.
हर्षदा गेली दोन वर्षे 58 महाराष्ट्र बटालियन बटालियन ओरस या ठिकाणी सातत्याने रायफल शूटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी जात असते ,बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांनी आपल्या बटालियनच्या ऑफिसर्स कडून तिचे सातत्याने प्रॅक्टिस घेतले होणारा सर्व खर्च बटालियन तर्फे केला, हर्षदा च्या घरापासून ते संपूर्ण भारतभर जिथे जिथे जाईल त्या ठिकाणचा सर्व खर्च बटालियन आणि आणि आर्मी विभागाकडून केला जात आहे, कोणताही खर्च न करता देशभरात खेळण्याची संधी फक्त एनसीसी च देऊ शकते असे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांनी व्यक्त केले, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या एनसीसी चा फायदा घ्यावा जेणेकरून तुम्हाला देशभरात आणि देशाबाहेर कोणताही खर्च न करता वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आणि स्पर्धेमध्ये भाग घेता येतो आणि ते केवळ फक्त यांची सी मुळेच होऊ शकते अशा प्रकारचे वक्तव्य कर्नल दीपक दयाल यांनी केले
सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विद्यार्थ्यांना देश पातळीवर नेण्यासाठी कर्नल दीपक दयाल आणि त्यांचा सर्व आर्मी स्टाफ सिंधूदुर्ग कॉलेजला सातत्याने मदत करत असतो , त्याबद्दल लेफ्टनंट प्राध्यापक खोत आणि कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी कर्नल दीपक दयाल यांचे आभार मानले.
आता जर हर्षदा देश पातळीवरच मेडल महाराष्ट्राला मिळवून दिल्यास महाराष्ट्राचे , बटालियनचे , कॉलेजचे , मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देशपातळीवर करण्यामध्ये तिचा मोठा सहभाग असेल. त्याचबरोबर तीच्या करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होणार आहे . त्यामुळे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी कर्नल दीपक दयाल, मार्गदर्शक associate NCC office लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत , प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर,, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, कृ. सी .देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचेसंस्थेचे अध्यक्ष मा .किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सेक्रेटरी गणेश कूशे, सीडीसी अध्यक्ष ॲडव्होकेट समीर गवाणकर , डायरेक्टर साईनाथ चव्हाण संदेश कोयंडे, ,विजय केनवडेकर , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटीये ,भाऊ सामंत ,महादेव पाटकर, इतर सर्व संस्था पदाधिकारी या सर्वांनी हर्षदाचे अभिनंदन केले आणि त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
हर्षदा बरोबरच सिंधुदुर्ग कॉलेजचे एनसीसी कॅडेट राहुल चव्हाण आणि गौरव चव्हाण या दोघांची दिल्लीमध्ये असणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड च्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी होणाऱ्या सिलेक्शन कॅमसाठी (RDC) चौथ्या टप्प्यात कोल्हापूर ग्रुप कडून या दोघांचे सिलेक्शन झालेले आहे, सध्या ते पुण्यामध्ये कॅम्प साठी गेलेले आहेत, पुढील काळात ते दिल्लीपर्यंत जावेत यासाठी त्यांनाही कर्नल दीपक दयाल आणि लेफ्टनंट प्राध्यापक खोत हे प्रयत्न करीत आहेत, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचे सुद्धा कर्नल दीपक दयाल , लेफ्टनंट खोत प्राचार्य ठाकूर आर्मी स्टाफ, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
नुकताच एक कॉलेजचा एनसीसी कॅडेट संतोष तांबे हा विद्यार्थी आंध्र प्रदेश मध्ये जाऊन दहा दिवसांचा नॅशनल कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करून आल्याबद्दल त्याचीही सर्वांनी कौतुक केले.
एकूणच सिंधुदुर्ग कॉलेजची एनसीसी आघाडी घेत आहे, या पुढील काळात सुद्धा सिंधुदुर्ग कॉलेजची एनसीसी यशावर यश आणण्यासाठी प्रयत्नशील असेल, मात्र यासाठी मला मालवण तालुक्यातील तडफदार विद्यार्थ्यांनी ज्याना खरोखरच आर्मी पोलीस नेव्ही तटरक्षक दल , बॉर्डर सेक्युरिटी फोर्स व देशातील इतर नामवंत उद्योगांमध्ये व व्यवसायामध्ये भरती व्हायचं आहे, ज्यांना आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करायचं आहे , जे विद्यार्थी मेहनती आहेत, ज्यांच्याकडे जिद्द चिकाटी मेहनत आहेअशा विद्यार्थी एनसीसी साठी हवे आहेत , अशाच विद्यार्थ्यांनी एनसीसी ला प्रवेश घ्यावा, रात्रंदिवस मेहनत करावी आणि आपल्या करिअरमध्ये प्रगती करावी , तसेच कॉलेजच्या नावाबरोबरच मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देशभरात करावे , त्यासाठी मला कितीही कष्ट पडले तरी चालतील मात्र माझ्या कॉलेजचा विद्यार्थी हा देशभरात आघाडीवर असला पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य सिंधुदुर्ग कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा डॉ एम आर खोत व्यक्त केले .