दापोलीत युवा दिनानिमित्त रेड रन मॅरेथॉन

Edited by: मनोज पवार
Published on: July 26, 2025 15:51 PM
views 50  views

दापोली :  आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचीत्य साधून युवक युवती यांच्यामध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनाजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग, जिल्हा शासकीय  सामान्य रुग्णालय, रत्नगिरी व उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दापोली येथे आज सकाळी  “रेड रन मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन  दापोलीचे उपविभागीय अधिकारी  डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत जेसीआय पदाधिकारी डॉ. सुयोग भागवत, मोहित  शिंदे (के के व्ही)  शिगवण सर (ए.जी.हायस्कूल), डॉ.माधुरी साठे ( दापोली होमिओपॅथी कॉलेज) प्रा.लाड (दापोली अर्बन कॉलेज) प्रा. जालिंदर पाटील (रामराजे कॉलेज) प्रा.गिरमकर (वराडकर कॉलेज) तसेच  वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत, डॉ. महेश भागवत, डॉ. बनसोडे, इन्चार्ज सिस्टर मळेकर, एन वाय जाधव, आयसीटीसी समुपदेशक पांडुरंग हुबाले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर बुरटे, विलास मस्के, सतीश कांबळे तसेच उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. 

रेड रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये यश शिर्के याने प्रथम, अथर्व चव्हाणने द्वितीय तर प्रथम गोवले याने तृतीय, सुनील रेवाळे याने चतुर्थ, आयुष बर्जे पाचवा क्रमांक मिळविला.  

मुलींमध्ये रेषम कोळंबेने प्रथम, दीक्षा कडूने द्वितीय, सानिया नेवरेकर हिने तृतीय क्रमांक, सिद्धी चीनकटेने चतुर्थ तर आकांक्षा रामाणे हिने पाचवा क्रमांक मिळविला. यातील प्रथम व दिवतीय क्रमांक विजेत्यांना राज्य स्तरीय रेड रन मरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.