पूर्वा गावडेचे महाराष्ट्र ऑलम्पिकमध्ये सुवर्ण यश

जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन कास्य पदके
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 14, 2023 09:15 AM
views 249  views

सिंधुदुर्गनगरी : पुणे - बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने चमकदार कामगिरी करत  जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण,आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत. तिच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी विषेश अभिनंदन केले आहे.

     पूर्वाने महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये जलतरण क्रीडा प्रकारात 4 x 200 मीटर रिले मध्ये व वॉटर पोलो मध्ये दोन सुवर्ण  पटकावली आहेत. तर 800 मीटर फ्री स्टाईल व 1500 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रकारात दोन कांस्य पदके पटकावली आहेत यापूर्वीही पूर्वाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर जलतरण क्रीडा स्पर्धेत मेडल पटकावली आहेत तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

   महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालयामार्फत पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी पुणे येथून खेळणारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधूकन्या पूर्वा संदीप गावडे हिने जलतरण मध्ये विविध प्रकारात घवघवीत यश मिळविले आहे जलतरण क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे याचे तिला मार्गदर्शन लाभले आहे .

  महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते तर बक्षीस वितरण क्रीडा आयुक्त डॉ सुहास दिवसे,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा पट्टू या मान्यवराच्या उपस्थितिमध्ये करण्यात आले आहे पूर्वा ही पुणे क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडे जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे त्याच ठिकाणी दहावीचे शिक्षणही घेत आहे.