भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला आगामी देशांतर्गत काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळणे आता कठीण जाणार आहे. शॉ इंग्लंडच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळतो. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता जिथे तो रॉयल लंडन वन डे चषक स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडला. त्याचवेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचे खेळणेही अत्यंत संशयास्पद मानले जात आहे.
पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी 2 ते 3 महिने लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला त्याचे पुनरागमन दिसून येईल आणि तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतो. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अधिकाऱ्यांनी शॉच्या दुखापतीबाबत चर्चा केली. ज्यामध्ये तो पुढील 2 ते 3 महिन्यांसाठी संघाबाहेर असण्याची शक्यता आहे. शॉ सध्या लंडनमध्ये असून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीची काळजी घेत आहे.
पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता- रॉयल लंडन वनडे चषकात नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळताना पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. शॉने एका सामन्यात 153 चेंडूत 244 धावांची शानदार खेळी केली. तर एका सामन्यात त्याने 76 चेंडूत 125 धावांची नाबाद झंजावती खेळी केली. मात्र, दुखापतीमुळे शॉ आता स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमधून पूर्णपणे बाहेर आहे.
या स्पर्धेत उकृष्ट कामगिरी करून फलंदाज शॉला भारतीय संघात पुनरागमनाचे दरवाजे उघडायचे होते. शॉ दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. आता शॉ रॉयल लंडन वन डे चषकात खेळताना फॉर्ममध्ये दिसला होता. परंतु त्याला आता दुखापत झाली आहे. आता तो काही काळ संगातून बाहेर राहणार आहे. यामुळे शॉच्या क्रिकेट खेळात अडचणी निर्माण झाल्या आहेत.