
सावंतवाडी: विरार मुंबई येथे रविवारी(ता.४) रोजी संपन्न झालेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत खेमराज बांदाच्या कु.प्रेरणा जय भोसले हिने कुमिते(कराटे) मध्ये सुवर्णपदक तर काता क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकावत घवघवीत यश संपादन केलं.
स्टेअर्स स्टेट युथ गेम्स,वेस्टर्न महाराष्ट्र कराटे चॅम्पियन शिप २०२५-२६ राज्यस्तरीय स्पर्धा विरार येथील ग्रीन पॅलेस रिसॉर्ट अर्नाळा बिच येथे संपन्न झाली.राज्यभरातील विविध अकॅडमी मधील स्पर्धक सहभागी झाले होते.
बांदा येथील खेमराज महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या प्रेरणा भोसले हीने कराटेत निर्विवाद वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावलं.तर काता या प्रकरातहि कास्य पदक पटकावत दुहेरी पदकाची कमाई केली.
इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सेल्फ डिफेन्सचे मुख्य संचालक व प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा भोसले प्रशिक्षण घेत आहे.आता या यशानंतर प्रेरणा हिची दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु.प्रेरणा भोसले हिने गेल्या तीन महिन्यात चार सुवर्ण पदकासह एकूण सात पदकांची कमाई केली आहे.प्रशिक्षक किरण देसाई यांच्यासह सौ.जान्हवी भोसले यांचे तिला मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या प्रेरणा भोसले हिचे बांदा तसेच जिल्हाभरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.













