सावंतवाडी : सावंतवाडी येथील शिव उद्यानात मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला. यात विजेता ठरला तो ओरोस येथील पोलिस सेवेत कार्यरत असलेले पैलवान आशिष जाधव तर सावंतवाडी येथील मल्ल रोहित जाधव उपविजेता ठरला. मल्लसम्राट केसरी विजेत्या आशिष जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, फेटा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच स्टार न्युट्रीशन्सचे रेक्सॉन फर्नांडिस यांच्याकडून रोख रक्कम रुपये ५ हजार आणि प्रोटीन भेट स्वरूपात देण्यात आला.
महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेत 'मल्लसम्राट केसरी' कुस्ती स्पर्धा २०२४ चं आयोजन केलं होतं. रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या सामन्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. महिला व पुरुष गटात या कुस्त्या जोरदार रंगल्या. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धेतील सहभागी कुस्तीगिरांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीच्या युवा शिलेदारांनी मेहनत घेतली.या स्पर्धेला जिल्हाभरातील कुस्तीप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. यात ओरोस येथील पोलिस सेवेत कार्यरत असलेला पैलवान आशिष जाधव विजेता तर सावंतवाडी येथील मल्ल रोहित जाधव उपविजेता ठरला.
पुरुष गटात ४० किलो वजनी गट प्रथम क्रमांक दुर्वास पवार कासार्डे, द्वितीय क्रमांक: तेजस पारकर, करूळ तृतीय : समर्थ पाटील, आंबोली. ४८ किलोत प्रथम क्रमांक: रुपेश चव्हाण, करूळ, द्वितीय क्रमांक : विश्वास चव्हाण, कासार्डे, तृतीय क्रमांक : पार्थ देसाई कासार्डे. तर ५४ किलो प्रथम क्रमांक : भावेश मर्ये, करूळ,द्वितीय क्रमीक : मयुरेश जाधव, सावंतवाडी,तृतीय क्रमांक : श्लोक मर्ये, कासार्डे. ६० किलोत प्रथम क्रमांक: तेजस दळवी, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक: संधर्म पाटील, आंबोली,तृतीय : यशदिप जाधव कणकवली, ६८ किलो प्रथम क्रमांक : नागेश सावंत कणकवली, द्वितीय क्रमांक: बाळू जाधव कासार्डे, तृतीय क्रमांक : प्रथमेश राठोड, सावंतवाडी. ७४ किलो प्रथम क्रमांक - गजानन माने कासार्डे,द्वितीय क्रमांक- कौशल पार्सेकर आंबोली,तृतीय क्रमांक: कौशल पार्सेकर आंबोली व ८० किलो गटात प्रथम क्रमांक - आशिष जाधव, ओरोस, ( मल्लसम्राट केसरी विजेता ) द्वितीय - रोहित जाधव सावंतवाडी, तृतीय - योगेश रावल, सावंतवाडी हे ठरले. महिलांचाही मोठा सहभाग या स्पर्धेत होता. महिला गटात ३५ किलो प्रथम क्रमाक : तन्वी पारकर, करूळ,द्वितीय क्रमांक : दुर्वा पाटील कासार्डे,तृतीय क्रमांक : सानिका घाडी, देवगड. ४० किलो प्रथम क्रमांक : पल्लवी शिंदे, करूळ,द्वितीय क्रमांक : कुंजल गावकर, वाडा ता. देवगड
तृतीय क्रमांक: सना शेख कासार्डे. ४४ किलोत प्रथम क्रमांक :-कस्तुरी तिरोडकर, करूळ,द्वितीय क्रमांक : रिद्धी परब, कासार्डे,तृतीय क्रमांक : भार्गवी गांवकर, वाडा - देवगड.४८ किलो प्रथम क्रमांक : कोमल जोईल, करूळ,द्वितीय क्रमांक : साक्षी तेली, कासार्डे,तृतीय क्रमांक: विधी चव्हाण, कासार्डे. ५४ किलो प्रथम क्रमांक : प्रतिक्षा गावडे, सावंतवाडी, द्वितीय : अंजली महाडीक देवगड, तृतीय :-आसावरी तानावडे, कासार्डे तर ६० किलो प्रथम क्रमांक : महेक शेख, करूळ,
द्वितीय क्रमांक:- यशश्री सावंत - भोसले, ओरोस, तृतीय : श्रावणी साईम, देवगड यांनी प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, बॉडी बिल्डर असो. जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, वाय.पी.नाईक, प्रा. रूपेश पाटील, ललित हरमलकर, सत्यवान बांदेकर आदींसह मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.