वेंगुर्ले : मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करताना वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयातर्फे सर्व खेळातील विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यामध्ये आंतरराष्ट्रीय कराटेमध्ये सुवर्णपदक विजेते सुधाकर आंगचेकर, राज्यस्तरीय कबड्डी व टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेल्या अपूर्वा परब, राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेल्या लिला परब, राज्यस्तरीय कबड्डी चाचणी स्पर्धेसाठी निवड झालेली भक्ती माळकर, १०० मीटर व २०० धावणे विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या आर्या संदिप पाटील, रायफल शूटिग विभागस्तरीय निवड झालेला गौरव दत्तप्रसाद आजगांवकर, ३ कि.मी.चालणे विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली दिव्यांका नामदेव लटम, हातोडा फेक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेला युवराज मस्के, लक्ष्मण राजन परब, देवयानी दत्ताराम कामत, रायफल शूटींगमधील विजेती सानिया सुदेश आंगचेकर, व्हॉलीबॉल महाराष्ट्र संघात निवड झालेली साक्षी सतिश शेट्टी, रायफल शूटिग राष्ट्रीय निवड झालेली स्नेहा रंजन नार्वेकर, व्हॉलीबॉलमधील सानिया नामदेव सरमळकर, पॉवरलिफ्टींग राज्य स्पर्धेसाठी निवड झालेला बाळकृष्ण परब यांचा समावेश होता.
यांच्या सत्कार समारंभप्रसंगी नंदन वेंगुर्लेकर, तालुका क्रीडा समन्वयक संजय परब, जयराम वायंगणकर, डॉ.वेंगुर्लेकर, सुनिल जाधव, जयवंत चुडनाईक, संजिवनी चव्हाण उपस्थित होते. तालुक्यात खेळासाठी आवश्यक सुखसोयींनी युक्त अशी मैदाने, इमारती, क्रीडा साहित्य उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.