
ब्युरो न्यूज : युकेमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन्सनशिप ऑफ लिजेंडमध्ये इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान बोर्डने खाजगी क्रिकेट लीगमध्ये देशाचे नाव वापरण्यास बंदी घातली आहे. नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीत पाकिस्तानने आपल्या देशाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम एशिया स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
WCLच्या दुसऱ्या आवृत्तीत भारताने पाकिस्तान चॅम्पियन्ससोबत सामना करण्यास दोनदा नकार दिल्याने पाकिस्तानच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे असे म्हणत PCBने हे पाऊल उचलले .असे असले तरी सद्याच्या पाकिस्तान चॅम्पियन्स संघाला शनिवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्धचा अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी असेल .मात्र यानंतर भविष्यात खाजगी संघटनांनी देशाचे नाव वापरण्या अगोदर PCB कडून स्पष्ट परवानगी घ्यावी तसेच असे न करता नाव वापरण्यात आले तर कायदेशीर कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे .