दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जल मिशन अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स, कुडासे ता.दोडामार्ग प्रशालेची विद्यार्थीनी सौम्या संदेश मणेरीकर हिने प्रथम क्रमांक पटकावला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मानीय रविंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते २१०००/ रु.रोख व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिव संतोष सावंत,समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर, सह.सचिव नंदकुमार नाईक,कुडासे सरपंच पूजा बाळाजी देसाई, पालकशिक्षक संघाचे उपाध्यक्ष पूजा दत्तप्रसाद देसाई, समन्वय समिती सदस्य सतिश मोरजकर,प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सायली परब, प्रभारी मुख्याध्यापक जे.बी.शेंडगे, ज्येष्ठ शिक्षक एस.व्ही.देसाई, पी.बी.किल्लेदार, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सौम्या मणेरीकर हिचे अभिनंदन केले सौम्या हिला अतुल वसावे सर व दिपाली पालव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.