संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ऑलिंपिक दिन जल्लोषात

Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2025 21:07 PM
views 144  views

सावंतवाडी : संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन शेखर जैन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करून करण्यात आली.

शाळेच्या क्रीडाशिक्षिका धनश्री तुळसकर यांनी या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांनी ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या पटांगणावर 100 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, बॅडमिंटन, हॉलीबॉल या विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.

ऑलिंपिक खेळाविषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी ऑलम्पिक मध्ये सहभागी विविध भारतीय खेळाडूंची माहिती सांगणारी डॉक्युमेंटरी फिल्म शाळेच्या डिजिटल क्लासरूम मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. क्रीडा प्रकाराविषयी प्रोत्साहित करून संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करण्यात आला.