मुंबई : आगामी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि रणजीपटू निखिल नाईकचा महाराष्ट्र संघात समावेश करण्यात आला आहे. मोहाली इथे येत्या 16 ऑक्टोबरपासून महाराष्ट्राचे सामने होणार आहेत. केदार जाधवच्या नेतृत्वात महाराराष्ट्राचा संघ या स्पर्धेत उतरेल.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएल स्पर्धेत निखिलनं दमदार कामगिरी बजावली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर निखिलने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान पक्के केले. निखिलनं याआधी महाराष्ट्राकडून वेगवेगळ्या वयोगटात प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच रणजी आणि आयपीएल स्पर्धेतही तो खेळला आहे.
महाराष्ट्राचा संघ – केदार जाधव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अर्शिन गायकवाड, अझीम काझी, निखिल नाईक, सिद्धार्थ म्हात्रे, अंकित बावणे, मंदार भंडारी, धनराज शिंदे, प्रशांत सोळंकी, विकी ओस्तवाल, प्रदीप दाढे, राजवर्धन हंगर्गेकर, विजय पावले, ऋषभ राठोड. राखीव – हितेश वाळुंज, प्रीतम पाटील, रोशन वाघसरे, तरणजीत सिंग, पियुष साळवी