जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत नाईक जिम अँड फिटनेस सेंटर यश

Edited by: दिपेश परब
Published on: November 22, 2023 19:56 PM
views 289  views

वेंगुर्ले : मालवण तालुक्यातील आचरा येथे १९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्ला येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटरच्या ५ जणांनी यश संपादन केले तर ३ जणांनी सहभागासाठी मेडल प्राप्त केले आहे.

यात आदित्य परब याने ६६ किलो ज्युनिअर वजनी गटात सुवर्ण पदक व स्ट्रॉंग मॅन ऑफ सिंधुदुर्गचा 'किताब पटकवला. तर आदित्य पालव याने ५९ किलो ज्युनिअर वजनी गटात रौप्य पडत, ओंकार भारती याने १०५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, प्रज्वल पालव यावे ८३ किलो वजनी गटात कांस्य पदक व रेश्मा धोकारे हिने ५७ किलो ज्युनिअर वजनी गटात कांस्य पदक पटकावले. 

    या स्पर्धेत सदाशिव नाईक, अनिकेत आळवे, अथर्व पालव यांनी सहभाग मेडल प्राप्त केले. या सर्व स्पर्धकांना नाईक जिम अँड फिटनेस सेंटरचे अमित नाईक, बाळू पेडणेकर व ईश्वर माने यांचे मार्गदर्शन लाभले.