न्यूझीलंडचा भारतावर 7 गडी राखून दमदार विजय

टॉम लेथमची तुफान फटकेबाजी, जोडीला केनची दमदार बॅटिंग
Edited by: ब्युरो
Published on: November 25, 2022 15:14 PM
views 267  views

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना ऑकलंडमध्ये पार पडला, ज्यामध्ये न्यूझीलंडने 7 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावां केल्या. ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद 145 आणि कर्णधार केनच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला.