दोडामार्ग : छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय सब-ज्युनि. साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघास कास्यपदक प्राप्त झाले. मुलांच्या संघातून खेळताना सरस्वती विद्यामंदिर, कुडासे ता. दोडामार्ग प्रशालेचा विद्यार्थी विष्णू सतिश देसाई याने उत्कृष्ट कामगिरी केली.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ. मिलिंद तोरसकर,सचिव संतोष सावंत, समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर, सह. सचिव नंदकुमार नाईक, कुडासे सरपंच पूजा बाळाजी देसाई, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पूजा दत्तप्रसाद देसाई, समन्वय समिती सदस्य सतिश मोरजकर, शालेय समिती सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी साॅफ्टबाॅल असो.चे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा शा. शि. महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे, प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सायली परब, प्रभारी मुख्याध्यापक जे. बी. शेंडगे, एस. व्ही. देसाई, पी. बी. किल्लेदार, क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विष्णू देसाईचे अभिनंदन केले.