सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ओरोस येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
17 वर्षाखालील मुले गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 14 वर्षाखालील मुले या गटामध्ये तृतीय क्रमांक, 17 वर्षाखालील मुली या गटामध्ये द्वितीय क्रमांक तर 14 वर्षाखालील मुली या गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सुयोग राजापकर व अमोल चौगुले यांचे प्रशालेचे मुख्याध्यपक कौस्तुभ देसाई यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर व सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेछा दिल्या.