रस्सीखेच स्पर्धेत नाना गावडे मित्रमंडळ तळवडे यांनी पटकावले विजेतेपद

नमो चषक २०२४
Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 09:57 AM
views 224  views

सावंतवाडी : तळवडे येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक २०२४ जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाना गावडे मित्रमंडळ तळवडे यांनी विजेतेपद पटकावले तसेच सिद्धिविनायक राईवाडी कुडाळ संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेचे उद्धाटन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही स्पर्धा शेवटच्या क्षणी रंगतदार ठरली. जिल्ह्यातून एकापेक्षा एक असा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. अखेरच्या क्षणी नाना गावडे मित्रमंडळ तळवडे यांनी विजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांक सिद्धेश्वर दाळकर संघ तळवडे व चतुर्थ क्रमांक सिद्धेश्वर तळवडे संघाने पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक आनंद नेवगी, प्रमोद गावडे, निशांत तोरसकर, दादा परब, सुशांत गावडे, विकास गावडे, किशोर सोन्सुरकर, त्रिंबक आजगावकर आदी उपस्थित होते.