दोडामार्ग : दोडामार्ग येथिल जि.प.पूर्ण प्राथ.शाळा नं.१ येथे दि.२७ व २८ जानेवारीला झालेल्या दोडामार्ग तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सिंहगर्जना आयनोडे संघाने विजेतापद पटकाविले. तर युवा कमांडो संघ उपविजयी ठरला. महिला गटात दोडामार्ग विजयी, भेडशी उपविजयी संघ ठरला पुरुष गटात तालूक्यात १२ संघाने प्रवेश घेतला होता.
स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बाळा नाईक, रंगनाथ गवस, मनोज पार्सेकर, सूचन कोरगावकर, संदीप गवस सुनील गवस, सुधीर पनवेलकर, पराशर सावंत, हे उपस्थित होते. या स्पर्धाचे नियोजन पराशर सावंत, दिपक गवस यांनी केले होते. अतिशय उत्साहात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित अटीतटीचे सामने संपन्न झाले.
या स्पर्धासाठी पंच म्हणून जर्नादन पाटील , प्रदिप गावडे, सोमनाथ गोंधळी, पोपट कोळी, स्वप्निल महाले, जानू पाटील, सुरज सावंत, अमित सावंत, शुभम कोलगावकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे निवेदन पत्रकार सुमित दळवी यांनी केले.