ARM प्रो कबड्डीच्या अटीतटीच्या सामन्यात नमो भालचंद्राय ठरला विजेता

महिला कबड्डीमध्ये हॉली क्रॉस सावंतवाडीनं पटकावलं प्रथम पारितोषिक
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 16, 2023 08:06 AM
views 169  views

कणकवली : ARM प्रो कबड्डी मध्ये नमो भालचंद्रय संघाने आपले नाव कोरले असून महिला कबड्डी मध्ये होली क्रॉस सावंतवाडी ठरला विजेता. पुरुष गटातील नमो भालचंद्राय व स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी यांच्यामध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेर नमो भालचंद्र हा विजेता ठरला व स्वयंभू रवानात यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले

सतत तीन दिवस दिवस रात्र चाललेल्या या अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रो कबड्डी साठी कबड्डी प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला कबड्डीच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी अभय राणे मित्रमंडळाच्या वतीने भरवण्यात झालेल्या महिला प्रो कबड्डी साठी महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हा महिला भगिनींना बोलावल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यामुळे पुढील महिला प्रो कबड्डी नियोजनामध्ये आम्ही तुमच्या सोबत असू असे देखील आश्वासन यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले यावेळी 

नगरसेविका सुप्रिया नलावडे, नगरसेविका मेघा सावंत ,प्रतीक्षा सावंत,भाजप शहराध्यक्ष प्राची कर्पे, बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका समन्वय सुनील पारकर, अभय राणे गणेश तळगावकर, भरत उबाळे ,महेश सावंत उपस्थित होते



कोकणच नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE वर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण 

या स्पर्धेच थेट प्रक्षेपण कोकणच नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE वर हजारोच्या संख्येने पहाटेपर्यंत पाहत होते. या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मंडळाचे सर्वेसर्वा अभय राणे यांनी बोलताना सांगितले की सलग तीन वर्ष आपण या कबड्डी स्पर्धा भरवल्या आहेत त्याला कबड्डीप्रेमींनी आम्हाला दिलेली साथ ही अतुलनीय आहे त्यामुळे पुढच्या वर्षी देखील आपण याहीपेक्षा मोठ्या स्पर्धा भरवणार. 

फायनलमध्ये झालेल्या महिला कबड्डी च्या सामन्यामध्ये होली क्रॉस सावंतवाडी यांनी जय गणेश, मालवणवर मात करत ARM चषकवर आपले नाव कोरले. 

तर पुरुष गटामध्ये सेमी फायनल स्वयंभू रवळनाथ  मधलीवाडी मित्र मंडळ आणि अनुभव लायन्स यांच्यामध्ये झाली यामध्ये स्वयंभू रवळनाथ मधली वाडीमित्र मंडळ विजयी होत त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला

दुसरा अंतिम फेरीचा सामना जय हनुमान मित्र मंडळ विरुद्ध नमो भालचंद्राय यांच्यात झाला.  त्यामध्ये नमो भालचंद्राय यांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला

अंतिम सामना नमो बालचंद्र व स्वयंभू रवळनात मधली वाडी मित्र मंडळ यांच्यात रंगला.  त्यामध्ये नमो भालचंद्र यांचे अष्टपैलू खेळाडू योगेश घाडीगावकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उत्कृष्ट पकड व राईट करत संघासाठी विजय खेचून आणला आणि संघाला विजय मिळवून दिला


सविस्तर निकाल असा

प्रथम क्रमांक - नमो भालचंद्र

द्वितीय क्रमांक -: स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी मित्रमंडळ 

तृतीय क्रमांक -: अनुभव स्पोर्ट

चतुर्थ क्रमांक -: जय हनुमान जाणवली

शिस्तबद्ध संघ - कोहिनुर स्पोर्ट्स

अष्टपैलू खेळाडू - योगेश घाडी

उत्कृष्ठ चढाई - परेश वालावलकर

उत्कृष्ट पकड - सिद्धेश भडसाळे

बोनस किंग - गिरीश चव्हाण

उगवता तारा - रुतीक चौगुले

या शेवटच्या सामन्याचे बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष अभय राणे यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे ,उपाध्यक्ष सर्वेश राणे,खजिनदार औदुंबर राणे सचिव सागर राणे, सहसचिव सुधाकर उर्फ बंडू राणे, संदेश आरडेकर, ,रोहन राणे, यश पालव, प्रथम सावंत, रुपेश साळुंखे, व्यंकटेश सावंत समीर सावंत, रोहन चव्हाण, शिवशंकर पारगावकर रुपेश वाळके, निखिल बागवे, रोहन चव्हाण,आदर्श राणे, विजय राणे,तेजस राणे यांच्यासह अभय राणे प्रेमी उपस्थित होते.