कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कुमारी श्रद्धा तळेकरच्या उपस्थितीत संपन्न झाल.
मान्यवरांचे स्वागत लेझिमच्या गजरात करण्यात आले. यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शालेय ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. यानंतर विविध खेळ कसे खेळावे ? या विषयी माहिती देणारे नृत्य सादर करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कुमारी श्रध्दा तळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी शाळेच्या सीईओ नीता शुक्ला, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, सचिव मोहन कावळे, खजिनदार परवेज पटेल, सहसचिव राजेंद्र ब्रह्मदंडे, मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई,अॅड सागर तळेकर, क्रीडा शिक्षक अमोल चौगुले उपस्थित होते.
प्रमुख अतिथी कुमारी श्रध्दा तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे संबोधित केले की, येणाऱ्या काळात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपले नाव उज्वल करावे. तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन आपले ध्येय निश्चित करून त्या मार्गाने सतत परिश्रम करावे असे सूचित केले. प्रशालेत सुरू असलेल्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धामध्ये धावणे, उंच उडी ,लांब उडी, गोळा फेक,क्रिकेट, हॉलीबॉल, कॅरम,बुद्धिबळ,रस्सिखेच, कब्बडी तसेच केजीच्या विद्यार्थ्यांसाठी चमचा गोटी, टेनिस बॉल थ्रो यासह अनेक नवीन विविध प्रकारचे खेळ या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहेत. या क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्याकरीता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत. यावेळी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.