देवगड : राज्य शासनाच्या क्रीडा संचालनालयाच्यावतीने आयोजित देवगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री भगवती हायस्कुल मुणगे आणि कै वीणा सुरेश बांदेकर ज्यू कोलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस च्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले आहे. १७ वर्षाखालील मुली गटातून १०० मीटर हरडल्स या क्रीडा प्रकारात रिया अरविंद सावंत हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत ती कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
देवगड तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष खालील मुली (800 मी धावण प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत –प्रथम क्रमांक, (१५०० मी धावणे ), प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत–प्रथम क्रमांक, (१०० मी– हर्डल्स), रिया अरविंद सावंत–द्वितीय क्रमांक.
१७ वर्ष खालील मुलगे
(११० मी हर्डल्स) श्रेयस सुरबा सावंत –प्रथम क्रमांक, आर्यन देविदास राणे–द्वितीय क्रमांक, (३००० मी धावणे) विराज विश्राम मुणगेकर –तृतीय क्रमांक.
भालाफेक मध्ये
आर्यन सुर्यकांत घाडी–प्रथम क्रमांक, तिहेरी उडी मध्ये विवेक मोहन परब–प्रथम क्रमांक. गोळाफेक मध्ये आर्यन सुर्यकांत घाडी -द्वितीय क्रमांक,
५ किलोमीटर चालणे मध्ये
भूषण संतोष खरात -प्रथम क्रमांक, स्वयंम रविंद्र रूपये -द्वितीय क्रमांक.
१४ वर्ष खालील मुलगे
गोळाफेक मध्ये
अथर्व दयानंद पटर्वधन-प्रथम क्रमांक, 80मी हर्डल्स मध्ये मृगाक्षी मंगेश हिर्लेकर -प्रथम क्रमांक यांनी यश प्राप्त केले होते.
ज्यू कॉलेज मधून ११० मी हरडल्स या प्रकारात प्रथम क्रमांक सोमनाथ संजय घाडी, द्वितीय शुभम शंकर परब यांनी यश प्राप्त केले होते. सर्व विध्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एन जी वीरकर यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एम बी कुंज, सौ.गौरी तवटे, हरीश महाले, एन जी वीरकर, प्रसाद बागवे, सौ कुमठेकर, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी शिक्षक शीक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.