सावंतवाडी : संत राऊळ महाविद्यालय कुडाळची विद्यार्थिनी व बॅडमिंटन खेळाडू मृणाली मंगेश मसके हिची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात स्तुत्य निवड झाली आहे. मृणाली मसके ही कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांची सुकन्या आहे. तिच्या निवडीबद्दल संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, क्रीडाशिक्षक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.