ज्युदो स्पर्धेत 'मदर क्वीन्स'ची दृष्टी मुंडयेची विभागस्तरावर झेप

Edited by: विनायक गांवस
Published on: August 09, 2025 19:35 PM
views 25  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सिंधुदुर्ग  जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीची विद्यार्थीनी कु.दृष्टी मुंडये हिने १४ वर्षे खालील वयोगट मुली यामध्ये 40 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.तिची निवड विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी झाली आहे.

तर लावण्या केसरकर हिने १४ वर्षे खालील वयोगट मुली यामध्ये 44 खालील वजनी गटात तिसरा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक अॅडव्होकेट शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉक्टर सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक भूषण परब, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.