सावंतवाडी : 24 वी FSKA विश्वचषक कराटे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. 13 वर्षाखालील गटात निशा नायर हिने प्रथम क्रमांक मिळवला.
14 वर्षाखालील गटात अदिती नाटेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. 15 वर्षाखालील गटात इशान पवार याने द्वितीय क्रमांक मिळवला. 16 वर्षाखालील गटात सानिध्या वेल्हार द्वितीय क्रमांक मिळवला.
तसेच राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मृण्मयी संदीप शिंदे हिने सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावरील सहभागाबद्दल तिला प्रशस्तीपत्रक व चषक देऊन गौरविण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पर्यवेक्षिका टीचर संध्या मुणगेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.