नाशिकमध्ये झालेल्या मास्टर गेम्स स्पर्धेत सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे यश

Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 14:37 PM
views 122  views

सावंतवाडी : 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान नाशिक येथे राज्यस्तरीय मास्टर गेम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गचे खेळाडू चंद्रकांत शिंदे यांनी 45+ वयोगटात  योगा- गोल्ड , लांब उडी- सील्व्हार,400 मी. व 1500 मी.धावणे ब्राँझ प्राप्त केले.

श्रीम. माधुरी खराडे यांनी 55+ वयोगटात 5 की. मी.चालणे, हाथो डा फेक , पॉवरलिफ्टिंग- गोल्ड ,  10000 मी धावणे,बॅडमिंटन - सिल्व्हर मेडल  मिळाले.श्रीम संजना सावंत यांनी 35+ वयोगटात  800 मीटर धावणे - गोल्ड मेडल,400मी धावणे - सिल्व्हर मेडल व 200 मी धावणे ब्राँझ मेडल मिळविले. श्री स्वप्नील सावंत यांनी 35+ या गटात बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं. वरील सर्व खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व खेळाडूंना सिंधुदुर्ग मास्टर गेम असोसिएशनचे सेक्रेटरी बयाजी बुराण यांचे सहकार्य लाभले. असोसिएशनचे अध्यक्ष अतुल रावराणे व उपाध्यक्ष अनिल हळदिवे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.