
रत्नागिरी : नुकत्याच जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा सन 2025 चिपळूण येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमीतील २० खेळाडूनी सहभागी होऊन 15 पदके मिळवून अग्रगण्य कामगिरी करून यश संपादन केले. रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शहानुर चिपळूण तालुका तायकंदो अकॅडमी च्या सहकार्याने पुष्कर स्वामी मंगल हॉल चिपळूण येथे 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, संचालक संजय सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत मंडणगड तायक्वांडो अकॅडमी संचलित तायक्वांडो सेंटर क्लब मंडणगडच्या खेळाडूंनी ७ वर्षाखालील स्पेशल गटात मुलींमध्ये आराध्या विनोद पवार हिने सुवर्ण पदक, प्रांजल हर्षल पाटील रोप्य, श्रीशा समीर कदम हिने कास्य, मुलांच्या गटामध्ये जय प्रमोद मोरे याने सुवर्ण, स्वास्तिक रुपेश पवार - रोप्य, रियांश प्रणय कुमार आयरे - कांस्य, सब ज्युनिअर गट मुलींमध्ये आराध्या अमोल कोळंबेकर हिने सुवर्ण , अर्णव समीर जाधव - कास्य, प्रशिक आदेश मर्चंडे - कास्य, कॅडेट गट मुलींमध्ये वेदिका दिगंबर वाळुंज -रोप्य, मुलांमध्ये वेदांत विजय दुर्गवले - कास्य, सीनियर महिला गटात सृष्टी विश्वदास लोखंडे - सुवर्ण, संस्कार नरेंद्र साळवी - कास्य, सीनियर तायक्वांदो पुमसे महिला गटात सौ. काजल विश्वदास लोखंडे – सुवर्ण, सीनियर पुरुष गटात विश्वदास हरिश्चंद्र लोखंडे - सुवर्ण ही पदके मिळवून यश संपादन केले. या खेळाडूंना मंडणगड तालुका तायकांडो अकॅडमी अध्यक्ष प्रशांत सुर्वे, प्रशिक्षक विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, ॲडव्होकेट तेजकुमार लोखंडे, क्रीडाशिक्षक संजय अवेरे, गौतम माने व प्रणव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू प्रशिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन तायक्वांदो सेंटर क्लबचे अध्यक्ष आदेश मर्चंडे, इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगडचे चेअरमन डॉक्टर सुरेश लेंडे, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संतोष मांढरे, मुख्याध्यापक महेंद्र महाजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.हुलोळे, नूतन विद्यामंदिर मंडणगडचे मुख्याध्यापक शांताराम पवार, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुष्मा बांगर, जि प शाळा गांधी चौक चे मुख्याध्यापक सुहास रांगले, तायक्वांदो अकॅडमीच्या संचालिका सौ दीपिका घोसाळकर, सेजल गोवळे, मानसी पालांडे, संचालक रवींद्र मिश्रा, जयराम कोटेरा, सुधीर महाडिक, पालक सौ. दिपाली पवार यांनी अभिनंदन केले.