जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 16, 2025 19:27 PM
views 22  views

मालवण : जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण २२५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाट्न जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, श्री. मारकड, श्री.शिंदे  तसेच कार्यालयातील पदाधिकारी व जिल्ह्यातील क्रीडामार्गदर्शक यांच्या उपस्थितीत झाले. या कुस्ती स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये १४ वर्षे वयोगट मुलगे- ३८ किलो वजन गट- तुकाराम नानू ठाकूर - प्रथम क्रमांक, 

५२ किलो वजन गट- हर्षवर्धन सागर वडर- तृतीय क्रमांक, १४ वर्षे वयोगट मुली- ५८ किलो वजन गट- दीक्षा सचिन नांदोसकर- प्रथम क्रमांक, १७ वर्षे वयोगट मुलगे- ५५ किलो वजन गट- गौरांग गणेश वाईरकर - तृतीय क्रमांक, ९२ किलो वजन गट- गौरव विनोद केसरकर -प्रथम क्रमांक, १७ वर्षे वयोगट मुली- ४० किलो वजन गट- कृतिका देवेंद्र लोहार- प्रथम क्रमांक, ४६ किलो वजन गट- नंदिनी सुनील गावडे - द्वितीय क्रमांक, १९ वर्ष वयोगट मुलगे- ५७ किलो वजन गट- अमन रुपेश गरुड - द्वितीय क्रमांक, ७९ किलो वजन गट- ओमकार शिरीष आळवे - प्रथम क्रमांक, १९ वर्ष वयोगट मुली- ५० किलो वजन गट- जागृती जनार्दन झोरे- द्वितीय क्रमांक, ५३ किलो वजन गट- विधी लहू गावडे - तृतीय क्रमांक यांनी यश मिळविले.  या विद्यार्थ्यांना वराडकर हायस्कुलचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. पेंडुरकर, क्रीडाशिक्षक श्री. हडलगेकर व श्री. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक भाट सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त - कर्नल शिवानंद वराडकर, ऍड. एस. एस. पवार,  अध्यक्ष अजयराज वराडकर,  उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनी अभिनंदन केले.