
मुंबई : नाशिक इथं नुकतीच १७ वर्षांखालील मुलांची राज्यस्तरीय फुटबाॅल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघही सहभागी झाला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. अगदी अटीतटीच्या लढतीत गोवा संघाने विजेतेपद पटकावल. तर तामिळनाडू संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ही स्पर्धा २८ मार्च ते ३१ मार्चला नाशिक इथं झाली. यात एकूण १२ संघ सहभागी झाले होते. 

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून सर्वेश सुधाकर राणे याने काम पाहिलं. सर्वेश हा सध्या मुंबईत अंधेरी इथं वास्तव्यास असून तो सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावचा सुपुत्र आहे. सर्वेश याला लहानपणापासून फुटबाॅल खेळाची आवड होती. फुटबाॅलमध्ये त्याने शालेय जीवनात आपल्या खेळाची चुणूक दाखवून अनेक पदके मिळवली आहेत. या स्पर्धेत सुद्धा सर्वेश याने प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र संघाचं आणि सर्वेशचं सर्वत्र कौतुक होत आहे.